औसा ते चाकूर, अलगरवाडी रोड दुरुस्तीचे काम घेऊन काम न करणाऱ्या डि कंस्ट्रक्शन व पी कंट्रक्शनवर कार्यवाही करावी
- जय महाराष्ट्र सेनाची मागणी..
रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वर खड्डेच खड्डे, अपघातांचे प्रमाण वाढले.
>>> रोड दुरुस्तीसाठी लागणाऱ्या मुरूम, खडी व दगडाची उत्खनन ; रोडच्या साईड पट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे
*** कामाचे टेंडर एकाला, रोडची दुरुस्ती कंस्ट्रक्शनला मलीदा खातोय कंट्राटदार (गुत्तेदार)
औसा प्रतिनिधी : - औसा ते चाकूर अलगरवाडी राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर खड्डेच खड्डे झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हायवे महामार्गावरील
रोड दुरुस्तीसह, रोडच्या साईड पट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामांसाठी लागणाऱ्या मुरूम व खडी, दगडाची राॅयल्टी (महसूल) न भरता रोड साईटने असलेल्या भागाचे उत्खनन सुरू आहे. या कामाचे टेंडर एकाला, रोडची दुरुस्ती कंस्ट्रक्शनला मलीदा खातोय कंट्राटदार (गुत्तेदार) अशी अवस्था झाल्याने औसा ते चाकूर, अलगरवाडी रोड दुरुस्तीचे काम घेऊन काम न करणाऱ्या डि कंन्टराक्शनवर व पी कंन्टराक्शनवर कार्यवाही करावी अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जय महाराष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आलेला आहे. परंतु राष्ट्रीय महामार्गाची अवस्था ग्रामीण रस्त्यासारखी झाली असताना, साधी दुरुस्ती करण्याचे प्रयत्न करण्यात आले नाही. महामार्गावरील रोड दुरुस्तीसह, रोडच्या साईड पट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून
यामुळे या महामार्गावर अपघाताची शृंखला सुरू झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेला आहे. खड्ड्यातून एक चाक निघाला की, दुसरा खड्डा तयारच असण्याचा अनुभव वाहन चालक घेत आहेत. रात्री या महामार्गाने प्रवास करताना जिकरीचे ठरत आहेत. खड्ड्यामुळे अपघात वाढले आहेत, परंतु साधी दुरुस्ती करण्यात येत नाही. केंद्र सरकारच्या अखत्यारित राष्ट्रीय महामार्ग असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कुणी विचारत नाहीत.
खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे राष्ट्रीय महामार्ग व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. प्रवास करताना सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. रस्त्यावर या अगोदर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महामार्गावरील खड्डे बुजवण्याचा टेंडर घेऊन काम न करणाऱ्या डि कंन्टराक्शनवर व पी कंन्टराक्शनवर कार्यवाही करावी अशी मागणी जय महाराष्ट्र सेनाचे अध्यक्ष जे.पी.औसेकर यांनी दि.25 नोव्हेंबर 2021 गुरुवार रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.या निवेदनात म्हटले की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 रत्नागिरी - नागपूर ह्या मार्गाच्या सिमेंट रस्त्याचे काम गंगामाई कंस्ट्रक्शन कंपनी औरंगाबाद ला सिमेंट रस्ता करण्याची काम हाती घेतलेला आहे. पण त्याच महामार्गावरील रोडचे खड्डे व साईड पट्टी रस्त्याचे 12 कोटीचे काम डि. कंन्टराक्शनला दिलेले आहे. तरी या दोघांनी आजपर्यंत एकही खड्डा बुजवलेला नाही, तसेच रोड दुरुस्तीसाठी लागणाऱ्या मुरूम, खडी व दगडाची उत्खनन करून शासनाची महसूल (राॅयल्टी) बुडवले जात आहे, साईड रस्ता हा डांबरीकरण केलेला नाही.तरी या दोन्ही कंस्ट्रक्शन कंपनीवर कार्यवाही करुन त्यांना बिल देऊ नये या खड्यामुळे आजपर्यंत अपघातात मृत्यू झालेल्या 11 जणांच्या औस-लातुर रोड अपघातास जबाबदार धरून राष्ट्रीय महामार्गाच्या काम करणाऱ्या कंपन्यावर
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.व त्या कंन्टराक्शन कंपनीचे नाव काळया यादीमध्ये टाकावे.आशी मागणी जय महाराष्ट्र सेनाचे अध्यक्ष जे.पी.औसेकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे.या निवेदनावर जय महाराष्ट्र सेनाचे अध्यक्ष जे.पी.औसेकर यांची स्वाक्षरी आहे.