Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन चा पोलिस नाईक अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळयात..!

उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन चा पोलिस नाईक अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळयात..!



आरोपी लोकसेवक भगवान व्यंकटराव गिरी, वय ३२ वर्षे, पद-पोलीस नाईक, वर्ग-३, नेमणुक- पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण, जि. लातुर यांनी  लाचेची मागणी करून लाचलाचेची रक्कम स्वतः स्विकारली म्हणुन गुन्हा दाखल.

लातूर-

यातील आरोपी लोकसेवक भगवान व्यंकटराव गिरी, पोलीस नाईक, पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण यांनी तकारदार यांचे पत्नी विरूध्द पो. स्टे. उदगीर ग्रामीण येथे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये अटक न करता त्यांच्या बाजुने तपास करून मदत करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार दिनांक २३/११/२०२१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातुर या कार्यालयाकडे प्राप्त झाली होती.


तक्रारदार यांचे तकारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांच्याकडून दिनांक २४/११/२०२१ रोजी १४.३२ वा चे सुमारास पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक पोलीस नाईक भगवान व्यंकटराव गिरी यांनी तक्रारदार यांच्या पत्नी विरूध्द पो स्टे उदगीर ग्रामीण येथे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये अटक न करता त्यांच्या बाजुने तपास करून मदत करण्यासाठी सुरूवातीला २५०००/ रूपयेची मागणी करून तडजोडीअंती २००००/- रूपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणुन ५०००/- रूपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.


आरोपी लोकसेवक पोलीस नाईक भगवान व्यंकटराव गिरी यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम तक्रारदार यांचे कडे देवुन दिनांक २४/११/२०२१ रोजी पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे पाठविले असता आरोपी लोकसेवक पोलीस नाईक भगवान व्यंकटराव गिरी यांनी लाचेची रक्कम ५०००/- रूपये १५.२६वाजता पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे पंचासमक्ष स्वतः स्विकारली म्हणुन त्याना रंगेहात पकडण्यात आले आहे.


तकारदार यांनी आरोपी लोकसेवक यांचे विरुध्द पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे कलम ७ ला.प्र.का.


अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.


गुन्हाचा तपास पोलीस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर हे करीत आहेत. सदरची सापळा कार्यवाही डॉ. राहुल खाडे, अतिरिक्त कार्यभार पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक पंडीत रेजितवाड, सपोउपनि संजय पस्तापुरे, पोह / रमाकांत चाटे, भागवत कठारे, फारूख दामटे, पोना / संतोष गिरी, अमर वाघमारे, मपोना / शिवकांता शेळके, पोका / शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, संदीप जाधव, दिपक कलवले, मंगेश कोंडारे, मपोशि रुपाली भोसले, पोका / गजानन जाधव, चापोना / राजु महाजन यांनी पार पाडली आहे.


तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी / कर्मचारीहे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा.


१) पंडीत रेजितवाड, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. लातुर


२) टोलफी हेल्पलाईन क्रमांक


३) कार्यालयाचा फोन क्रमांक


४)


Website


Mobile App


६) Facebook Page


मो. ९३०९३४८९८४


- २०६४


- ०२४८२-२४२६७४


www.acbmaharashtra.gov.in


www.acbmaharashtra.net


www.facebook.com/MaharashtraACB


पोलीस अधिक्षक,


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post