लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधकांचे बाद झालेले 10 अर्ज वैध
भाजपची काही प्रमाणात झाली दिवाळी गोड....!
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीत अवैध ठरलेल्या उमेदवारांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्याकडे दाखल केलेल्या अपिलाचा निर्णय होऊन विरोधी नऊ जणांचे दहा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश आप्पा कराड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ निवडीसाठी येत्या 21 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, त्या निवडणुकीत भाजपच्या वतीने सर्व जागांवर पस्तीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते .मात्र 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननीत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या सर्व उमेदवारीवर आक्षेप नोंदविण्यात आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार ढगे यांनी सदरील अक्षेपाच्या सुनावणीअंती विरोधकांचे सर्व अर्ज अवैध ठरवले होते. या निर्णयाविरोधात विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्याकडे अपील करण्यात आले सदरील अपिलाची सुनावणी 28 ऑक्टोबर रोजी झाली त्यात दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन विभागीय सहनिबंधक रावळ यांनी अवैध ठेरवलेल्या विरोधी नऊ जणांचे दहा उमेदवारी अर्ज मंजूर केले आहेत असे आमदार रमेश आप्पा कराड यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज मंजूर केलेल्या मध्ये भगवान रामचंद्र पाटील तळेगावकर (सोसायटी मतदार संघ देवणी), संतोष नागोराव सारंगे (सोसायटी मतदार संघ शिरूर आनंतपाळ) बाबू हनुमंतराव खंदाडे( इतर मागास वर्ग मतदारसंघ) ओमप्रकाश गिरीधर नंदगाव ( भटक्या विमुक्त जाती मतदार संघ) सतीश रावसाहेब आंबेकर (मजूर फेडरेशन मतदारसंघ )नवनाथ शिवराज डोंगरे (नागरी बँक मतदारसंघ) सुरेखा रमाकांत मुरुडकर आजजी सुनील कांबळे सय्यद इक्बाल बेगम इस्माईल (प्रतिनिधी मतदारसंघ) व अंजली सुनील कावळे (अनु.जाती मतदारसंघ) या नऊ जणांचे दहा उमेदवारी अर्ज विभागीय सहनिबंधक वैध ठरवले असल्याचा दावा आमदार रमेश आप्पा कराड यांनी दावा केला आहे
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील एकाधिकारशाही व निवडणूक होणारच नाही ही ठाम भूमिका घेऊन साम-दाम-दंड-भेद याचा वापर करून निवडणूक बिनविरोध काढण्याचे सत्य यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे उमेदवारांचे अर्ज वैध झाल्याच्या निकालामुळे सत्ताधाऱ्यांना मोठी चपराक बसली असल्याचे ते बोलले