राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचा
राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यव्यापी ठिय्या आंदोलनास
लातूरकरांचा शंभर टक्के सहभाग
* जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विविध संघटनांनी एक मुखानी केली मागणी
* ठिय्या आंदोलनास राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, मध्यवर्ती संघटना तसेच जिल्ह्यातील विविध संघटनांचा
सहभाग…
* प्रथमच अधिकारी व कर्मचारी एकवटले..
* जिल्हाधिकारी, लातूर यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने निवेदन केले सादर
* यापुढेही मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन कायम सुरु राहणार
लातूर, दि.29 :- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने नोव्हेंबर,2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्वांना अंशदायी पेन्शन योजना व 2015 नंतर रुपांतरीत झालेली राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली. ही कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी योजना रद्द करुन सर्वांनी जूनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आज राज्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी संघटनांच्या वतीने राजयव्यापी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर भाषणात नवीन पेन्शन योजना रद्द करुन जूनी पेन्शन योजना लागू करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. त्यांनतर जिल्हाधिकारी लातूर यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे विनंतीही करण्यात आली.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्यासमोर कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नासंबंधी असंख्य अधिकारी, कर्मचारी व संघटनांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी ॲड.अण्णाराव भूसने,अप्पर कोषागार अधिकारी डी.एम.कुलकर्णी, दिपक येवते, बी.बी.गायकवाड, व्यंकटेश हालिंगे, गोविंद लाडेकर, संजय कलशेट्टी यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष बी.बी.गायकवाड, राज्य सहसचिव तथा सरचिटणीस संजय कलशेट्टी, कार्याध्यक्ष आर.एस.तांदळे, उपाध्यक्ष दिपक येवते, अशोक माळगे, कोषाध्यक्ष रमाकांत आगरे, महसूल संघटनेचे अध्यक्ष महादेव पांचाळ, उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्यवंशी, भूमी अभिलेख संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष प्रल्हाद लखनगीरे, जिल्हाध्यक्ष संजय जाधव,माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटना गट क चे विवेक डावरे, अहेमद बेग, दिलीप वाठोरे, श्री. व्यंकटेश हालिंगे, संतोष क्षिरसागर, धनंजय चामे, श्री. कोकणे, श्री. जोशी, भाई श्रंगारे यांच्यासह आदिं मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती होती. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी व संलग्न संघटनांनी विशेष प्रयत्न केले.