खाजगी व्याजबट्टी करणार्यांच्या वसुलीदारांच्या तगाद्याला वैतागून व्यापाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल
एका बॅंकेच्या कर्मचार्यांसह तिघांना अटक....!
लातूर-
खाजगी व्याजबट्टी करणार्यांच्या वसुलीदारांच्या तगाद्याला वैतागून शहरातील एलआयसी कॉलनीतील एका व्यापार्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी शहरातील एलआयसी कॉलनीतील घटली होती यासंदर्भात शहरातील तब्बल अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका बँकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
शहरातील प्रगती नगर एलआयसी कॉलनी परिसरात वास्तव्यास असणारे किराणा दुकान व्यवसायिक उल्लास रावसाहेब पाटील यांनी याच परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिरातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि.२६ आक्टोंबर रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास उघडकीस आली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून पैशाच्या वसुलीसाठी धमक्या देणाऱ्या व्यक्तींची नावे त्यात लिहिली होती .यासंदर्भात मयत उल्हास पाटील यांच्या पत्नी लताबाई उल्हास पाटील यांच्या तक्रारीवरून विवेकानंद पोलिस स्टेशन मध्ये अकरा जणांविरुद्ध गुरव नंबर 691/ 21 कलम 306, 34 भादवी अन्वये शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी मध्ये लिंबराज केशवराव जाधव ज्ञानोबा सुरवसे, सोपान पांचाळ, सुंदर गजानन पाटील साईनाथ स्वामी, जगदीश साळुंखे, लाला कदम ओमकार सुंदर पाटील ,विजयाताई जगताप पृथ्वीराज पाटील व त्यांचे वडील अशा 11 जणांचा समावेश आहे.लिंबराज जाधव, सोपान पांचाळ, बाळासाहेब सुरवसे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे तपास अधिकारी हाजी सय्यद यांनी सांगितले पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शंकर मोरे व हाजी सय्यद हे करीत आहेत