लातूर मध्ये जिल्हा- अधिकाऱ्यांनी घेतली जमीन..?
सोबत भ्रष्ट मार्गाने कमवून देणार्यांचाही समावेश...! किरीट सोमय्याजी याकडे लक्ष देणार का......?
लातूर-लातूरचे नाव शिक्षण क्षेत्राने उंचावर नेले असुन शिक्षणासाठी लोकांचे लातूर कडे येण्याचे प्रमाण वाढले.त्यामुळे "लातूर" हे नाव नवीन राहिले नाही त्यानंतर दुष्काळाने हे नाव जगभरात नेऊन पोहोचवले. रेल्वेने पाणी आणणारे पहिले गाव असे संबोधले जाऊ लागले .परंतू या जिल्हा -अधिकाऱ्यांनी याचे भान ठेवले नाही .त्यांनी सर्वसामान्यांना लुटण्यासाठी एक स्वतःची टीम तयार करून पैसा कमवून, लातूर मध्येच जमीन खरेदी केल्याची जोरदार चर्चा सध्या लातूर शहरांमध्ये होऊ लागली आहे. विशेष म्हणजे या जिल्हा -अधिकाऱ्याने स्वयंघोषित बार साठी बारा लाख रुपये अधिकृत पत्याच्या क्लबसाठी 25 लाख रुपये परवान्यासाठी मध्यास्था कडून घेऊन आपले पितळ उघडे केले.मटका किंग "गुरूजी"च्या निकटवर्तींना पत्याच्या क्लब चे लायसेन्स ,कोणास कळू नये म्हणून कर्नाटक सिमेवर "अभिमन्यु"च्या शेतात तेही जाता जाता देण्यात आले.ते आता त्या क्लब मध्ये सर्रास तिर्रट आणि मटका चालवत असल्याचे बोलले जात आहे.तर अवैध वाळू उपसा,बार,क्लबचे लायसेन्स मधून तर क्रीडा संकुल मधील एका फिटनेस क्लब मधूनही भ्रष्ट माया गोळा केली असल्याची चर्चा सध्या जोरदार होऊ लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये काही नगरसेवकांचा ही समावेशअसल्याचे बोलले जात आहे. हा पहिला अधिकारी नसुन,लातूर मध्ये येणारे प्रत्येक जण यासाठी भरमसाठ पैसे देत असल्याचे समोर येत आहे. येणारा प्रत्येक अधिकारी जर अशाच प्रकारे सर्वसामान्यांना लुटणार असेल तर एक दिवस हे लोक खिशातून पैसे काढून घेण्यासाठी मागेपुढे बघणार नाहीत. लातूरचे नाव उंचावर नेण्यासाठी खूप लोकांनी आपले जिवाचे रान केले आहे. असे अधिकारी लातूरमधेच लातूरच्या लोकांमधून अवैध मार्गाने पैसा गोळा करून ते जमिनी खरेदी करत "ड्रिम सिटी" च्या नावावर पुन्हा पैसा गोळा करण्याचे षड्यंत्र उराशी बाळगत आहेत. त्यांना काही नगरसेवक साथ देत आहेत यापेक्षा वाईट काहीच नाही.हे षड्यंत्र कोठेतरी थांबवले पाहिजे.अवैध मार्गाने सर्वसामान्यांच्या खिशाला चाट लावून कमावलेली जागा सरकारने जप्त करने अवश्यक बनले आहे. "एखादा नासका कांदा, सर्व कांद्याला नासवतो".त्या प्रकारे हा अधिकारी बदली झालेली असतानाही लातूर मध्ये ठाण मांडून असतो, तो नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही आपल्यासारखे शिकवतो.त्यामुळे अधिकारी भ्रष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या समोर सध्या कोणाचेही चालत नाही काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या हे लातूर दौऱ्यावर होते त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याची शपथ घेतली. आता ही शपथ सत्यात उतरण्याची वेळ आली असल्याचे सर्वसामान्यांचे मत होऊ लागले आहे.या अधिकाऱ्याने भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या पैशातून दुसर्यांच्या नावें जमिन खरेदी केली आहे त्या जमिनीचे कागदपत्र काढून ,कोण कोण या मध्ये सामील आहेत? त्यांची नावे लातूरकरां समोर येणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.हे फक्त किरीट सोमय्या व त्यांची टिम करतील अशी अपेक्षा लातूरकर करीत आहेत.