Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

खाजगी व्याजबट्टी करणार्यांकडून पैशाचा तगादा, एल आय सी कॉलनी परिसरात दुकानदाराची आत्महत्या आत्महत्या पूर्वी लिहून ठेवली सुसाईड

 खाजगी व्याजबट्टी करणार्यांकडून पैशाचा तगादा,

 एल आय सी कॉलनी परिसरात दुकानदाराची आत्महत्या 

आत्महत्या पूर्वी लिहून ठेवली सुसाईड 



लातूर- प्रगती नगर, एलआयसी कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेल्या किराणा दुकान चालकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी साडेसहाच्या सुमारास उघडी झाली .उल्हाास राावसाहेब पाटील वय वर्षे 45 असे मयत व्यवसायिकाची नाव आहे. याबाबद विवेकानंद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान मयत व्यक्ती जवळ एक सुसाइड नोट सापडली असून यात काही लोकांची नावे असून मुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे





याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, एलआयसी कॉलनी परिसरात उल्हास पाटील यांचे कालेश्वर किराणा सेंटर नावाची एक किराणा दुकान आहे.ते मागील काही दिवसापासून आर्थिक संकटात असल्यामुळे त्यांना काहि खाजगी व्याजबट्टी करणार्यांचे देणे झाले होते तर काही जणांनी वसुलीसाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता.या तगाद्याला  वैतागून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती  आढळलेल्या सुसाईड नोट वरून सांगण्यात येत आहे. विवेकानंद चौक पोलिसात तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे यांनी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एच जे सय्यद हे करीत आहेत

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post