Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गंजगोलाई परिसरात गुटख्याच्या गोडाऊनवर छापा,तब्बल 20 लाखाचा गुटखा जप्त.

 गंजगोलाई परिसरात गुटख्याच्या गोडाऊनवर छापा,तब्बल 20 लाखाचा गुटखा जप्त.








लातूर- पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्री जैन त्यांच्या सूचनेनुसार गांधी चौक पोलीस व अन्न व औषध प्रशासन यांनी शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी चार ते सहाच्या दरम्यान गंजगोलाई येथे असलेल्या गुटख्याच्या गोडाऊन वर छापा टाकला व त्या ठिकाणावून तब्बल प्राथमिक अंदाजानुसार 20 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला  असल्याची माहिती मिळाली..त्यानुसार सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी १वाजे पर्यंत पोलीस स्टेशन येथे गुटखा मोजण्याचे काम चालू होते,या बातमीमुळे शहरात एकच खळ बळ उडाली असून शहरात राजरोस पणे गुटखा चालू असल्याचे निष्पन्न झाले आहे..विशेष म्हणजे "मी नाही त्यातली' कडी लावा आतली",म्हणनार्या एका बड्या व्यापार्यावर हि कार्यवाही झाली असुन,लातूर शहरात हा व्यापारी २०१४पासुन कार्यरत असुन,आत्ता पर्यंत बर्याच वेळेस कार्यवाही होवून सुध्दा पुन्हा त्याच जोमाने तो गुटखा आणतो,या मागचे नेमके कारण काय आहे?कोणता आधिकारी त्याला हे काम करण्यासाठी बळ देत आहे,ते आता पोलिस अधिक्षक साहेबांनी शोधून काढने आवश्यक बनले आहे.पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे साहेब हे अवैध धंद्यावर आवर घालण्याचा प्रयत्न करित आहेत,त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यवाही मध्ये पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्री जैन त्यांच्या सूचनेनुसार गांधी चौक सहाउप विभागीय पौलिस अधिकारी कदम साहेब,गांधी चौक पीआय माकोडे,एस एस अन्यबोईनवाड,शिंदे,दयानंद पाटील व अन्ना आऔषध प्रशासनाचे अधिकारी लोंढे से होते.

       

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post