क्रूरतेचा कहर!
जावयानेच केला सासु व आत्याचा खुन
खुन करुन मृतदेहाचे तुकडे करुन शेततळयाच्या कपरीत पुरले, कोणास कळू नये म्हणुन गायीचीही केली हत्या.
अखेर गोटेवाडीतील बेपत्ता महिलेचा शोध लावण्यास किल्लारी पोलीसांना यश,
किल्लारी : दि.१०/०७/२०२१ रोजी सौ.तुलसाबाई त्रिमुखे यांनी त्यांची आई त्रिवेणीबाई सोनवणे व मावशी शेवंताबाई सावळकर ह्या दि.०७/०७/२०२१ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याचे सुमारास गोटेवाडी शिवारातुन मिसींग झाल्याबाबत किल्लारी पोलीस ठाणेस तक्रार दिली होती त्या अनुषंगाने किल्लारी पोलीस ठाणेच्या पथकासह अप्पर पोलीस अधिक्षक श्री.हिम्मत जाधव , औसा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राजीव नवले , प्रभारी अदिकारी सुनील गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवुन तपास गतीमान केला.
यातील दोन्ही मिसींग महिलेचा अधिक तपास करता सदर शेवंताबाई सावळकर यांचा जावई राजु उर्फ त्र्यंबक नारायणकर यांचे सोबत जमीनीबाबतचा वाद असल्याने निष्पन्न झाले व त्याबाबत घातपात झाल्याची शक्यता वाटत असल्याने अधिक तपास करणेकामी मा.पोलीस अधिक्षक श्री. निखिल पिंगळे , अपर पोलीस अधिक्षक श्री. हिंमत जाधव ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राजीव नवले, किल्लारी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री.सुनिल गायकवाड यांचे मार्गदर्शनात व पोलीस उप निरीक्षक श्री.अमोल गुंडे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही मिसींग महिलेचा शोध कामी पोहेका सचिन उस्तुर्गे , प्रदिप येरणवाड यांचे पथक दोन वेळा मुंबई येथे आठ- आठ दिवस पाठविण्यात आले होते.
किल्लारी पोलीस ठाणेच्या पथकातील पोउपनी गुंडे, पोहेका सचिन उस्तुर्गे, पोका प्रदिप येरणवाड यांनी मुंबई येथे जावुन आठ दिवस तळ ठोकुन मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री.हिम्मत जाधव यांचे सतत मार्गदर्शनाखाली अहोरात्र मेहनत घेवुन कसोशीने तपास करुन संशईत राहत असलेल्या मानखुर्द ,गोवंडी शिवाजीनगर , कुलाबा मुंबई इ.ठिकाणी शोध घेवुन अखेर त्यास कुलाबा येथे दि.१०/०८/२०२१ रोजी सापळा रचुन पकडण्यात यश मिळविले
त्यांनतर सदर पथकाने मिसिंग महिलेबाबत संशईताकडे अधिक तपास केला असता यातील मिसिंग महिला शेवंताबाई सावळकर यांचा जावई राजु उर्फ त्र्यंबक गुरुसिद्द नारायणकर रा.मानखुर्द मुंबई यांने अपहरण केल्याची खात्री झाल्याने सदर मिसिंग महिलेचा मुलगा नवनाथ सोनवणे यांनी दिलेल्या जबाबावरुन राजु उर्फ त्र्यंबक नारायणकर यांचे विरुद्द किल्लारी पोलीस ठाणेस कलम ३६४ प्रमाणे दोन्ही महिलेचे अपहरण केले बाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यावरुन आरोपी नामे राजु ऊर्फ त्र्यंबक नारायणकर यांस अटक करुन तंत्रशुद्द पद्दतीने तपास करुन विचारपुस केली असता सदर आरोपीने संपत्तीचे वादावरुन सदर दोन्ही महिलेचा खुन करुन पुरावे नष्ट करण्याचे उद्देशाने त्याचे तुकडे करुन पोत्यात भरुन गोटेवाडी शिवारातील स्वताचे शेतातील शेत तळ्यात पुरुन टाकल्याचे सांगीतले वरुन दि. १२/०८/२०२१ रोजी आरोपीने पोलीस कस्टडी दरम्यान दोन्ही महिलेचे पुरलेले प्रेत सदर शेत तळ्यात काढुन दिले. त्यावरुन सदर गुन्हयात कलम ३०२,२०१ भादवी प्रमाने वाढ करण्यात आली,सदर बाब कळताच सदर ठिकाणी पोलीस अधिक्षक श्री.निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक श्री.हिम्मत जाधव , औसा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राजीव नवले यांनी घटनास्थळी भेट दिली.
सदर पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र परिश्रम नमूद आरोपीस अटक केली. यामुळे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी सर्व पथकाचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
सदरची कामगिरी ही, वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनी सुनिल गायकवाड, पोउपनी अमोल गुंडे, पोहेका सचिन उस्तुर्गे, पोहेका गौतम भोळे, पोका आबासाहेब इंगळे, पोका प्रदिप येरणवाड, पोका दतात्रय गायकवाड तसेच सायबर शाखेचे गणेश साठे यांनी अत्यंत परिश्रम घेवुन निष्ठेने केली.
सदर आरोपीस मा.न्यायालयाने दि.१४/०७ /२०२१ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे
गुन्हयाचा अधिक तपास किल्लारी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनी सुनिल गायकवाड हे करीत आहेत.







