Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातुर महानगरपालिकेतील पदोन्नती प्रक्रिया स्थगित करा,अ. भा. संतुजी ब्रिगेडची मागणी

 लातुर महानगरपालिकेतील पदोन्नती प्रक्रिया स्थगित करा,अ. भा. संतुजी ब्रिगेडची मागणी




--------------------------------------

लातुर दि.८.६.२०२१ अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडच्या वतीने लातुर महानगरपालिकेच्या उपायुक्त मयुरा शिंदेकर यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन महानगरपालिकेतील पदन्नोती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी करण्यात आली

महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण बंद करण्यात आले आहे. परंतु शासन स्तरावर पदोन्नती मधील आरक्षण कायम ठेऊन 

मागासवर्गीय समाजास न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे, पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय रद्द करणेसाठी विविध राजकिय पक्ष, संघटना एकजुटीने प्रयत्न करत असून लवकरच सदर प्रश्नाबाबत निर्णय लागण्याची दाट  शक्यता आहे

सद्यस्तिथित लातुर महानगरपालिके मध्ये कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. शासन स्तरावर पदोन्नतीचे आरक्षणाच्या प्रश्न निर्माण झाला असताना तसेच विविध राजकीय पक्ष व संघटना  पदोन्नती मधील आरक्षणाच्या बाजूने प्रयत्नशील असताना लातुर महानगरपालिका लगबगीने पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करत आहे ते मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्यासारखे आहे

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजातील लोकांना नौकरीत जाण्याचा सैद्धांतिक उपदेश केला व तो एक सामाजिक मागासलेपणावर उपचार आहे. त्यांनी दूरदृष्टी ठेवून समाजातील मागासलेपणावर उपचार आहे. त्यांनी दूरदृष्टी ठेवून समाजातील मागासलेल्या प्रवर्गातील लोकांना आरक्षणाद्वारे न्याय देण्याचा प्रयत्न केला, संविधानिक तरतूद इतकी मजबूत आहे की कोणाच्या विरोधाने पदोन्नोतील आरक्षण बंद होऊ शकत नाही

शासन स्तरावर आरक्षणा बाबत योग्य तो ठाम निर्णय होई पर्यंत महानगरपालिका प्रशासनाने पदोन्नती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी अखिल भारतीय प्रदेश महासचिव अँड अमितकुमार कोथमिरे, प्रदेश संघटक दिगंबर कांबळे, महेंद्र गायकवाड, संकेत गौते, नागेश गौते आदींच्या स्वाक्षऱ्या आहे

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post