एमआयटीचे रोखपाल गोपाळघरे यांचे कोरोनामुळे दु:खद निधन
लातूर दि. ०१- लातूर येथील एमआयटी शैक्षणिक संकूलातील रोखपाल बाबासाहेब गोपाळघरे यांचे कोरोना आजारामुळे मंगळवारी पहाटे लातूर येथील रुग्णालयात दु:खद निधन झाले.
बीड जिल्हयातील केज तालुक्यातील मौजे नांदूरघाट येथील बाबासाहेब गोपाळघरे हे गेल्या अनेक वर्षापासून लातूर येथील एमआयटीच्या मेडिकल कॉलेज मध्ये रोखपाल म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसापासून कोरोना या आजारामुळे यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत होते.
उपचार सुरू असताना गोपाळघरे यांचे १ जून २०२१ मंगळवार रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास दु:खद निधन झाले. त्यांच्यावर नांदूरघाट या जन्मगावी आज अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबासाहेब गोपाळघरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.
लातूर एमआयटी संकूलात सर्व विभागाच्या वतीने गोपाळघरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून हे दु:ख पेलण्याची ताकद त्यांच्या कुटूंबाला मिळो अशी प्रार्थना करण्यात आली.
अत्यंत मनमिळावू शांत स्वभावाचे आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे बाबासाहेब गोपाळघरे यांच्या दुर्दैवी दुखद निधनाबद्दल एमआयटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एन.पी.जमादार, उपअधिष्ठाता डॉ. बी.एस. नागोबा, डॉ. सरीता मंत्री, डॉ. सुरेश कांबळे, डॉ. पल्लवी जाधव, डॉ. एच. एच. जाधव, प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केले.
