भारतीय माहिती अधिकार समूहातर्फे लातुरात 300 गोरगरीब नागरिकांना धान्य किट वाटप
लातूर शहरातील इंद्रायणी नगर मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर , लॉकडाउनच्या बिकट परिस्थितीत देशातील नागरिकांचे अतोनात झालेल्या नुकसानाचे दखल म्हणून भारतीय माहिती अधिकार समूहाच्या लातूर टीमने आपणही समाजाला मदत करण्याचे प्रथम पाऊल धान्य वाटप च्या उपक्रमाने सुरुवात करून भारतीय माहिती अधिकार समूहाचे देशभरात नावलौकिक करण्याचा विडा उचलला अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणात 300 धान्य किट वाटपाचा कार्यक्रम संपन्न भारतीय माहिती अधिकार समूहाचे मुख्य संपादक मा . शौकत अब्दुल कलाम नायकवडी , प्रतिनिधी शरद माळी ,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री पी. डी .चव्हाण यांची उपस्थिती या सामाजिक उपक्रमाला लाभली. भारतीय माहिती अधिकार समूहाचे लातूर जिल्हाप्रमुख माननीय श्री रामेश्वर सूर्यवंशी यांच्या या निस्वार्थ कार्य भावनेचे कौतुकास्पद उत्साहाला सलाम करून समाजातील प्रत्येक समूहातील राज्यभरातील कार्यकर्त्याने आदर्श जोपासावा आणि खऱ्या अर्थाने आपल्या विश्वास पूर्वक निवडीला खऱ्या अर्थाने न्याय द्यावा असे आवाहन मुख्य संपादक श्री शौकत अब्दुल कलाम नायकवडी यांच्याकडून करण्यात आले यावेळी भारतीय माहिती अधिकार समूहाचे लातूर टीम मधील सौ राणी बिराजदार मॅडम, माननीय श्री महादेवराव कळसे, दिनेश कांबळे, भिमाशंकर नेटके,तसेच इतर प्रतिनिधी व कार्यकर्तेचे आभार व्यक्त केले अशा सामाजिक उपक्रमात प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून बोलवून सन्मान दिल्याबद्दल माननीय श्री पी डी चव्हाण यांनी लातूर जिल्ह्यातील संपूर्ण टीमचे व भारतीय माहिती अधिकार समूहाचे आभार व्यक्त केले
