श्री केशवराज रेनीसन्स इंटरनॅशनल सि.बि.एस.सी स्कुलच्या बेकायदाशीर बांधकामास स्थगिती.
लातूर;दि ६ में
डी मार्ट जवळ,सर्वे नं २६४ नांदेड रिंगरोड, येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाईच्या श्री. केशवराज शैक्षणिक संकुल लातूरच्या श्री केशवराज रेनीसन्स इंटरनॅशनल सि.बि.एस.सी.
स्कुलच्या दोन मजली इमारतीच्या गतीने चालु असलेल्या अनाधिकृत बांधकामास लातूर दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. संस्थेचे सदस्य पंजाबराव मस्के यांनी जेष्ठ विधिज्ञ अॅड श्री बी.व्ही. पटवारी,अॅड सौ. अश्विनी कुलकर्णी अॅड श्री.प्रशांत कुलकर्णी अॅड.जी.एस नाईक यांच्या मार्फत यासाठी न्यायालयास दाद मागीतली होती.
संस्थेच्या मालकीच्या कासारगांव येथील ३ एकर जागेवर बांधकाम करण्या ऐवजी प्रतिवादी भाशिप्रच्या संस्थाचालकांनी याच शिवारातील श्रीनिवास माचिलेंची जागा भाडेपट्ट्याने घेऊन त्यावर ४ कोटी पेक्षा जास्त रुपयाचे अनाधिकृत बांधकाम करून संस्थेची व धर्मादाय आयुक्तांची आर्थिक फसवणूक केली आहे.
संस्थेने माचिले यांच्याकडून भाड्याने घेतलेली सर्वे नं २६४ मधील दोन एकर जागा नगररचना खात्या अंतर्गत प्राथमिक शाळा,खेळाचे मैदान, कत्तलखान्यासाठी डीपी प्लॅन मध्ये आरक्षित आहे.अशी डीपी आरक्षित जागा माचिले कडुन वर्षाला नऊ लाख रूपये व तीन वर्षाला १५% भाडेवाढ अशा अव्यवहार्य भाडेतत्वावर २९ वर्षाच्या कराराने केशवराज रेनीसन्स सि.बी.एस.सी इंटरनॅशनल स्कुलच्या बांधकामासाठी घेऊन प्रतिवादी संस्थाचालकांनी संस्थेला व धर्मादाय आयुक्तांला फसवले आहे असे वादीने दाव्यात नमुद केले आहे.
सदरील जागेचा स्थानिक संस्था पदाधिकारी यांना भाडेपट्टा करणा-याचा अधिकार देणारा केंद्रीय भाशिप्र संस्थेचा ठराव नसल्यामुळे स्थानिक अध्यक्ष व स्थानिक कार्यवाह यांनी सदरील जागेच्या भाडेपट्ट्यावर स्वाक्ष-या ग्राह्य धरता येत नाहीत. त्यामुळे भाडेपट्टाच चुकीचा करून धर्मादाय संस्थेचे नियमाचे पालन केले गेले नाही. अनाधिकृत भाडेपट्ट्याने घेतलेल्या अनाधिकृत जागेवरील अनाधिकृत बांधकाम तात्काळ थांबवावे व संबंधीत संस्थाचालकावर संस्थेची व धर्मादाय आयुक्तांची अर्थिक फसवणूक केली म्हणून कार्यवाही करावी असे वादीने दाव्यामध्ये शेवटी नमुद केले आहे.
लोकाश्रयावर व लोकांच्या देणग्यावर चालणा-या मराठवाड्यातील सर्वात मोठ्या असलेल्या शिक्षण संस्थेचे आर्थिक नुकसान होऊ नये. बांधकामामुळे होत असलेला संस्थेचा आर्थिक अपव्यय थांबवला जावा. सदरील संस्थेच्या हितासाठी संस्थेचे सदस्य पंजाबराव मस्के यांनी न्यायालयात धाव घेतली होती.त्यास न्यायालयाने श्री केशवराज रेनीसन्स इंटरनॅशनल सिबिएससी स्कुलचे बांधकाम प्रतिवादीने त्यांचे म्हणने दाखल करे पर्यत जैसे थे स्थितीत ठेवण्यासाठी आदेश प्रतिवादी संस्थाचालकास दिले आहेत
.●●●●●●●●●●●●
संस्थेची मालकीची ३ एकर जागा उपलब्ध असुनही त्याच परिसरातील भाडेच्या जागेवरच शाळेचे बांधकाम करण्याचा हट्ट का ? ४ मार्च २०१८ रोजी संघाचे मा.प्रांत संघचालक कै.श्री मधुकर (दाजी) जाधव यांच्या शुभ हस्ते संस्थेच्या स्वत:च्या मालकीच्या कासारगांव येथील ३ एकर जागेत श्री.केशवराज रेनीसन्स सिबिएससी इंटरनॅशनल स्कुल च्या इमारतीचे भुमीपुजन करण्यात आले होते. परंतू भुमिपुजन झालेल्या जागेवर बांधकाम करण्याचे संस्थाचालकांनी टाळले व त्याच परिसरातीस माचिले यांची २ एकर जागा भाड्याने घेऊन त्यावर शाळेची दोन मजली इमारतीचे बांधकाम केले.स्वत:ची जागा असताना असे का केले? हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे. असे करणे म्हणजे मा.प्रांत संघचालक कै.दाजी जाधव यांचा आपमान आहे. असे सर्व स्वयंसेवकात बोलले जात आहे.
●●●●●●●●●●
