वाह... मोदीजी!.. वा!
" किसी की जान लेना, खून होता है। लेकिन समय और वक्त आने पर, जान लेना राजकारण!"
"ज्याची बॅट, तोच करणार बॅटिंग! असे लहानपणी आम्ही खेळत होतो ,परंतु आपण तर देशासोबत आणि शंभर करोड जनतेसोबत खेळत आहात,त्यांच्या ..आरोग्या सोबत आणि आता तर त्यांच्या जीवाचे हि पैसे करत आहात...! याला म्हणतात... मल्टिलेव्हल मार्केटिंग. आधी "मरणाची"भीती घालायची, त्यानंतर त्यांना जगण्याचे स्वप्न दाखवून..आपला माल विकायचा. खरे पाहिले तर आपली जडणघडण ज्या राज्यात झाली आणि ज्यांच्या सोबत झाली त्यांची मानसिकता हा "धंदा"व्यापार राहिला आहे. आपली ही मानसिकता त्या एका "व्यापारा" सारखी झाली आहे .याच गोष्टीमुळे देशातील ....उच्चभ्रू व्यापारी आपल्या सोबत राहून आपली स्वप्ने साकार करत आहेत.त्यामुळे टाटा,बिर्ला,आदानी,अंबानी हे देशाचे मानक आपल्यापासुन दुर नाहीत..आणि आता "पुनावाला" ही आपल्या पासुन लांब नाही. कोरोनाच्या या अति भयंकर काळातही आपण 'लोकांच्या खिशातून पैसे कसे काढायचे?...हेच ध्येय ठेवून आपण पुढे चालत आहात.पहिल्या कोरोना काळात संपूर्ण "देश लाॅकडाऊन"केलात मान्य आहे त्यावेळेस आपण या"कोरोना विषाणु "संदर्भात नविन होतात.लोकांनीही आपल्या प्रत्येक वेळी सांगण्यावर विश्वास ठेवून आपणास मदत केली.देशातील नागरिकांनी लाठ्या काट्यांचा मारा हि सहन केला. त्यांच्याकडून दंडाच्या स्वरूपात हजारो करोड रुपये आपण गोळा केलात....पीएम फंडात हि लाखो-करोडो रुपये गोळा झाले, त्याचा वापर आपण कोणत्या गोरगरीब नागरिकांसाठी केला हे देशातील नागरिकांना कळणे आवश्यक आहे.आपण लाॅकडावून ची गरज नाही,असे वारंवार संबोधित करत आहात...एक वेळ खरे असेल! तर...मग महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव हा तयार करण्यात आला आहे का?.....मार्च महिन्यातच कोरोना का वाढत आहे?...वाढत असलेले मृत्यू चे आकडे हे खोटे आहेत का?...असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडत आहे.मग यावर आपण काय करत आहात?...का तुमच्या हातात काहिच राहिले नाही?याचे उत्तर आपण पंतप्रधान म्हणुन देने आपेक्षीत आहे.
सध्याची महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती पाहता, शास्त्रज्ञांना मानाचा मुजरा...! मेडिकल क्षेत्रात आपला देश लांब लांब पर्यंत दिसत नाहीत तरी अतिशय हुशारीने शास्त्रज्ञांनी लस तयार केली... मग त्यांची किंमत कंपनीनी२००रू केली... आणि देशाने श्वास सोडला..! एवढ्या कमी दरात लस तयार झाली...आणि ती मिळत आहे...याचा आनंद सामान्य नागरिकांना होता.परंतू हा आनंद जास्त काळ टिकला नाही. पूनावाला च्या पोटात दुखत होते की काय?...हजारो करोड़ रूपये कमवून देणारी लस आपण किरकोळ भावा मध्ये देशाला देत आहोत...अशी भावना होत असावी, उलट याचा अभिमान बाळगायचा सोडून तो देशाला" ब्लॅकमेल" करू लागला. लसीची निर्मिती.. शोध.. ,संशोधन वर कंपनीचा प्रचंड खर्च झाला आहे.. भरून काढायचा आहे ....माझ्याकडे यंत्रसामग्री नाही.. मी एवढ्या लस तयार करू शकत नाही ...असे म्हणुन, ओरडायला लाडला....! मग काय पंतप्रधान मोदी गरिबाचे कैवारी लगेच 4 हजार 500करोड दिले. देशात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असल्याचे समोर येताच केंद्र सरकारने यातील 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण 1मे पासून करण्याचा निर्णय जाहीर करताच ...क्षणाचाही विलंब न लावता 200 रुपयाची लस४००/ ६०० रुपये करून स्वतःचा फायदा करून घेतला. आणि केंद्राने१५०रुपयला लस घेऊन स्वत:चा फायदा करून घेतला.मग महाराष्ट्रातील जनतेने काय घोडे मारले आहेत काय?...का द्यायचे ४०० रुपये?... एवढे कमी पडले म्हणून की काय खाजगी डॉक्टरांना ६०० रुपयाला देण्याची परवानगी दिली...अरे कुठे फेडणार हे पाप....पैशै...राजकारण..सत्ता...करून आपण एके दिवशीं मरून जाताल...आणि ज्या नावासाठी केले ते नाव ...दुसरे कोणीतरी येवून पुसुन टाकतील....!
काय चाललय देशात...नुसता धंदा ....काळा बाजार अणी आता तर.... लसीचाही काळाबाजार करून लुटणार्या कंपन्याला केंद्र सरकारने ४५०० करोड रुपये दिले!कशासाठी...?२००रूपयाची लस ४००/६००रुपयाला घ्यायसाठी का?....का..त्यांनाही यामध्ये मलिदा भेटतो...हे जनतेला कळायला हवे.
जनतेला लुटण्यात अग्रेसर असलेले काही डॉक्टर.. रेमी डीसीवेअर बनवणाऱ्या कंपन्या... त्यानंतर हे कमी पडत होते म्हणून ...काही नेतेही मागे नाहित. आता कोरोना चा कहर वाढत आहे.मृत्यूचे आकडेही वाढत आहेत.. शिक्षण नाही... पैसे नाही...नौकर्या नाहीत अशी अवस्था देशात निर्माण झाली .
दुसरीकडे महाराष्ट्रात लाॅकडाऊन होतो.... प्रथम जनता कर्फ्यू...नंतर ८ वाजेपर्यंत बंद....पुन्हा जिल्हा बंद..! अरे..गोरगरिबांचे जीव घेऊनच थांबणार आहात काय? सर्वसामान्य गोरगरिबांचा विश्वास सरकार आणि नेत्यावरून उडत चालला आहे. खोटे बोलण्यात तर नेत्यांना "पद्मभूषण पुरस्कार" द्यावा असे सगळे बोलत आहेत... चुकून मुख्यमंत्री झालेल्यांना तर सध्या काय चालू आहे? ते कळण्यातच पाच वर्ष संपते की काय?...असे दिसत आहे.
एका पिक्चर मधला डायलाग यावरून आठवला अमिताभ बच्चन यांचे उच्चारलेले हे वाक्य....
"किसी की जान लेना, खून होता है। समय और वक्त आने पर जान लेना, राजकारण कहलाता है।
हे तंतोतंत सध्याच्या राजकारणात होताना दिसत आहे...फक्त कारण "कोरोना"दिसत आहे. हे कुठे थांबणार माहीत नाही...परंतू देशात आता लोकांना मरण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही?...अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. त्यामुळे
" घर मे बैठो यारो ,बाहर मौत खडी है!
मौत को साथ देने के लिए, सभी काळाबाजारी करनेवालेही पिछे नही है।



