प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा लातूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती महोत्सव स्वानंद फंक्शन हॉल लातूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे जिल्हाध्यक्ष लहू शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली पाटील, राज्य उपाध्यक्ष अजय सुर्यवंशी मराठवाडा अध्यक्ष विष्णु अष्टीकर, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन भाले, प्रसिध्दी प्रमुख संतोष सोनवणे श्री गणेश होळे, रवी बिजलवाड, श्रीकांत चालवाड, अंकुश ननवरे, दत्तात्रय परळकर तसेच श्री रवींद्रनाथ टागोर विद्यालयाचे शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



