पिडित महिलांनी न्याय मागणी साठी
सखी वन स्टॉप संस्थेला संपर्क साधावा
लातूर, दि.22(जिमाका):- पिडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी व मार्गदर्शनासाठी लातूर जिल्हयात केंद्र शासन पुरस्कृत “सखी वन स्टॉप सेंटर ” ही योजना जून 2020 पासूनसुरु करण्यात आली आहे. या योजना शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली करीत आहे.
शारिरिक, मानसिक , लैंगिक व कौंटूबिक छळाने त्रस्त झालेल्या महिलांना व मुलींवरील लैंगिक शोषण, ॲसिड हल्ला , छेडछाड ,अपहरण,(मिसिंग/ किडण्यापिंग) बलात्कार, हुंडा मागणी, कौंटुबिक हिंसाचार अशा इतर तक्रारी दाखल करता येतात. एकाच छताखाली सखी वन स्टॉप सेंटर मध्ये पिडित महिलांना किंवा मुलींना विविध सुविधा पुरविल्या जातात आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती वर्षा पवार यांनी कळविले केले आहे. जिल्हयात अशा पिडितांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक मंगल मगर यांच्याशी संपर्कासाठी मो. नं. 9665417166 आहे.
या केंद्राचे कामकाज पूढील प्रमाणे-अत्याचारास सामोरे जावे लागणा-या महिलेला विविध बाबीवर मदतीची आवश्यकता असते. मानसिकरित्या खच्चीकरण झालेल्या या महिलांना एकाच छताखाली मोफत वैदयकिय सेवा , पोलिस मदत, समुपदेशन, कायदेशीर मदत, निवासी सुविधा आदि प्रकारच्या सुविधा या सखी वन स्टॉप सेंटर मधून पुरवण्यात येत आहेत.
कौंटुबिक छळाच्या माध्यमातून अनेक वेळी महिलांना घराबाहेर काढले जाते. अशामहिलां तक्रारी करण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटरला येतात, पिडित महिलांच्या गरजेनुसार या सेंटरच्या वतिने तात्पुरत्या स्वरुपात निवा-याची सुविधा उपलब्ध करुन देण्यातयेते. 2015 पासून देशभरात लागू करण्यात आलेली योजना लातूर जिल्हयात जून 2020 पासून कार्यान्वयीत आहे.
सखी वन स्टॉप सेंटर लातूर मध्ये आज तागायत कौंटूबिक हिंसाचाराच्या 16, लैगिक हिंसाचार - 01, इतर तक्रारी - 02, अशा एकूण 23 केसेस दाखल झाल्या आहेत.यामध्ये समुपदेशन ,निवासाची सोय - 05, पोलिस साहयता 02, वैदयकिय सुविधा - 02, कायदया विषयक मदत - 03 , अशा प्रकारच्या मदत देण्यात आल्या तसेच 14 पिडितांना न्याय देण्यात आला. असे जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
****