एल टी आर सॉफ्ट मध्ये इन्फोसिस चा ऑनलाईन टेस्ट ड्राईव्ह
लातूर दिनांक 11: येथील एल टी आर सॉफ्ट मध्ये १२ व १३ डिसेंबर रोजी इन्फोसिस या अग्रगण्य मल्टिनॅशनल कंपनीचा ऑपेरेशन एग्झिक्युटीव्ह या पदासाठी ऑनलाईन टेस्ट ड्राईव्ह होणार आहे. कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीतही इन्फोसिस च्या माध्यमातून लातूरच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हि संधी एल टी आर सॉफ्ट ने मिळवून दिली आहे.
या ऑनलाईन टेस्ट ड्राईव्ह साठी बी एस सी कॉम्पुटर सायन्स/ फिजिक्स / मॅथेमॅटिकस / सॉफ्टवेअर इंजिनीरिंग , बीसीए च्या अंतिम वर्षात शिकत असणारे म्हणजेच २०२१ पासआउट विद्यार्थी पात्र असतील. या साठी या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी मध्ये किमान ६० टक्के तसेच पदवी मध्ये ६५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. मागील वर्षी अश्याच टेस्ट ड्राईव्ह मधून एल टी आर सॉफ्टचे ६ विद्यार्थी इन्फोसिस मध्ये निवडले गेले आहेत. या टेस्ट ड्राईव्ह मध्ये १२ व १३ डिसेंबर रोजी ऑनलाईन टेस्ट होणार असून यामध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन इंटरव्ह्यू सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये होणार आहेत.
मागील शैक्षणिक वर्षात एल टी आर सॉफ्ट मधून विविध महाविद्यालयांचे एकूण ७२ विद्यार्थी विप्रो, टीसीएस, इन्फोसिस, व कॅपजेमिनी अशा मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये मध्ये लागले आहेत. यावर्षी सुद्धा लातूर तसेच परिसरातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक प्रा. किशोर जेवे व प्रा. अमोल कुंभार यांनी केले आहे