Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिरूर आनंतपाळ येथे कोरोना रुग्णांसाठी कंटेनमेंट झोन तयार केले परंतु त्या नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्यास प्रशाशनाचे दुर्लक्ष!

शिरूर आनंतपाळ येथे कोरोना रुग्णांसाठी  कंटेनमेंट झोन तयार केले परंतु त्या नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्यास प्रशाशनाचे दुर्लक्ष!



लातूर-शिरूर आनंतपाळ तालुक्यात पाच दिवसांमध्ये कोरणा रुग्णांचा आकडा 40 च्या पुढे गेला असून  ही साखळी नाही तुटली तर तालुक्यासह तालुक्यातील नागरिकांना  याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील
 गेल्या आठवड्यापासून शिरूर आनंतपाळ येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार केलेले आहेत त्या नागरिकांन अत्यावश्यक सेवा कचऱ्याची विल्हेवाट पाणीपुरवठ्याची  सेवेचा अभाव असून   नगरपंचायत प्रशासनाने याबाबत विशेष लक्ष देऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा आशयाचे निवेदन शिरूर आनंतपाळ येथील युवकांनी तहसीलदार अतुलजटाळे यांना दिले आहे या निवेदनात नमूद करण्यात आले की, शहरात अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आली असून त्या कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध होत नाहीत कंटेनमेंट झोनमधील कचऱ्याची विल्हेवाट लागत नसून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावर पाणी थांबत आहे.


 याबाबत तहसीलदार अतुल जटाळे यांनी दिलेल्या निवेदनावर योग्य तो विचार करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल असे नमूद केले


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post