Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अंतिम मुदतीची वाट न बघता शेतकऱ्यांनी वेळेत विमा भरावा

अंतिम मुदतीची वाट न बघता शेतकऱ्यांनी वेळेत विमा भरावा


लातूर,दि.16-(जिमाका)- खरीप हंगामातील पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव सादर करण्याची 31 जूलै 2020 ही अंतीम मुदत आहे. शेवटच्या टप्प्यात तांत्रीक अडचणी निर्माण होतात म्हणून शेतकऱ्यांनी गर्दी न करता वेळेत विमा सहभाग नोंदवावा. तसेच विमा सहभाग नोंदवतांना आपला मोबाईल क्र. इलेक्ट्रॉनिक  शाक्षांकन करावा जेणेकरुन विमा सहभागाबाबतची माहिती एस.एम.एस. व्दारे शेतकऱ्यांना दिली जाईल. 
 सी.एस.सी. केंद्र/ बँक यांनी शेतकऱ्यांकडून तलाठयामार्फत साक्षांकीत केलेला 7/12 देण्याचा अग्रह करु नये. सी.एस.सी. केंद्र चालकांनी विना शूल्क विमा भरुन घ्यावा. कर्जदार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होणे अथवा न होणे बाबत कर्ज खाते असलेल्या बँक शाखेत विहीत नमूण्यात स्वतंत्र घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्जदार शेतकरी घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकाकर समजला जाईल.
 इच्छुक शेतकऱ्यांना अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात, भारतीय कृषि विमा कंपनी मार्फत कार्यरत पिक विमा सुविधा व सल्ला केंद्रामध्ये, नजीकच्या बँकेत किंवा wwwpmfby.gov.in   या संकेत स्थळावरुन माहिती उपलब्ध्‍ करुन घेता येईल. 
शेतकऱ्यांची सदर योजनेत सहभागी होण्यासाठी असलेली अंतिम मुदत 31 जूलै 2020 आहे. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी विमा संरक्षित क्षेत्रामध्ये पिक बदलाबाबत सुचना देण्याचा अंतिम दिनांक विमा नोंदणीच्या अंतिम दिनांकापुर्वी 2 कार्यालयीन दिवस अगोदर असेल. तरी शेवटच्या टप्प्यात गर्दी व घाई न करता वेळेत आपल्या पिकाचे विमा संरक्षणासाठी नजीकच्या बँकेत नागरी सुविधा  केंद्रात पिक विमा संरक्षण घ्यावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post