सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ११ भाषांत ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन
लातूर* - भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरा ही मानवजातीला हिंदु धर्माने दिलेली अद्वितीय देणगी होय ! राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना धर्मसंस्थापनेचे कार्य याच गुरु-शिष्य परंपरेने केले आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या थोर गुरु-शिष्य परंपरेचे स्मरण करणे आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेला १ हजार पटींनी कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ सर्वांना व्हावा, तसेच गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, यासाठी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्ष देशभरात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जातो. या वर्षी, ५ जुलै २०२० या गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी हा महोत्सव सरकारच्या निर्देशांनुसार ऑनलाईन माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, पंजाबी, बंगाली, उडिया, तेलुगु, कन्नड, तमिळ आणि मल्याळम् या ११ भाषांमध्ये ५ जुलैच्या सायंकाळी ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवां चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या महोत्सवांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या महोत्सवांत श्रीव्यासपूजन, श्रीगुरुपूजन, साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन, तसेच आपत्काळात हिंदूंचे कर्तव्य आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना या विषयांवर अनमोल मार्गदर्शन होणार आहे.
गुरु म्हणजे निर्गुण ईश्वराचे देहधारी सगुण रूप. या गुरूंमुळेच शिष्याची जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका होत त्याला मोक्षप्राप्ती शक्य होते. असे गुरु आपल्या जीवनात यावे म्हणून तीव्र तळमळीने साधना करावी लागते. त्यासाठीचे मार्गदर्शन या महोत्सवात होणार आहे. सध्याच्या महामारीच्या आपत्काळात दैवी बळाची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे या महोत्सवात सहभागी होण्याने गुरूंचा आशीर्वाद लाभेल, तसेच हिंदूंचे धार्मिक संघटनही होईल. तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवा चा लाभ करून घ्यावा, तसेच तुमचा मित्र-परिवार, परिचित, नातेवाईक यांनाही याचे निमंत्रण द्यावे, असे आग्रहाचे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठी भाषेतील ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव हा ५ जुलैला सायंकाळी ७ वाजता होणार असून तो अथवा द्वारे पहाता येईल. त्याच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :
1. FaceBook.com/Sanatan.org
2. YouTube.com/SanatanSanstha1
सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील पुढील लिंक वर अन्य भाषांमधील गुरुपौर्णिमा महोत्सवांविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे -
https://www.Sanatan.org/en/Gurupurnima
आपला नम्र,
श्री. हिरालाल तिवारी,
सनातन संस्था, लातूर
(संपर्क क्रमांक : ९९७५५९२८५९)