Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये कोविड उपचाराचे औषध विकत आणण्यास सांगितले,वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

लातूर मध्ये कोविड उपचाराचे औषध  विकत आणण्यास सांगितले,


वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल


 


मुंबई, दि. 19-


  लातूर येथील विलासराव  देशमुख  शासकीय वैद्यकीय  विज्ञान संस्थेच्या  रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णाला महागडे औषध बाहेरून आण्याचीची शिफारस केल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


राज्यात कोविड  विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी  येत आहेत. या सर्व रुग्णांवर शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे  मात्र असे असूनही  कोविड  उपचारासाठी  आवश्यक असलेले Tossilizumab हे महागडे औषध लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या  रुग्णालयातून रुग्णास बाजारातून विकत आणण्यास सांगण्यात आले.  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतल्याने वैद्यकीय  शिक्षण संचालकांनी अधिष्ठाता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


 लातूर येथे घडलेली ही बाब अतिशय गंभीर असून शासनाच्या आदेशाचे आणि धोरणाचे उल्लंघन करणारी आहे त्यामुळे अधिष्ठाता यांच्याविरुद्ध साथरोग अधिनियम तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमा नुसार  शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचे स्पष्टीकरण तीन दिवसात मागितले आहे.


 


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post