Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भाजपा शहर प्रेस मिडीया प्रमुखपदी काझी...

भाजपा शहर प्रेस मिडीया प्रमुखपदी काझी...


औसा प्रतिनिधी /- औसा शहर भाजप प्रेस मिडीया सेलच्या प्रमुखपदी शमशुल हक्क अ हक्क काझी यांची निवड करण्यात आली आहे. या बाबत औसा येथे दि. 14 जून रविवार रोजी औसा भाजप आ. संपर्क कार्यालय येथे शहराध्यक्ष लहू कांबळे यांच्यानेतृत्वाखाली व आ. अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत भाजप औसा शहर प्रेस मिडीया च्या प्रमुखपदी शमशुल हक्क काझी यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देण्यात आले, यावेळी औसा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, युवानेते संतोष मुक्ता, प्रा भीमाशंकर राचट्टे , युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष धनराज परसने, शहर सचिव विनोद जाधव सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
       आ. अभिमन्यू पवार यांच्यासह तालुका व शहर कार्यकारणीतील पदाधिकारी  यांच्यानेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी संघटना मजबूत करण्यात येत असून या अगोदर त्यांनी भाजप अल्पसंख्यांक मोर्चा सेलच्या मिडीया प्रमुखपदी म्हणून कार्यरत होते. गेल्या बऱ्याच वर्षांपासून भाजप विचार श्रेणीतून काम करत भारतीय जनता पक्षाचे शहर प्रेस मिडीया प्रमुखपद हे निश्चितच पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्षाला बळकटी आणण्यासाठी असणार आहे. 
शमशुल हक्क काझी पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून आता शहर प्रेस मिडीया प्रमुखपदीची जबाबदारी सोपविण्यात असल्याने त्यांच्या निवडीबद्दल युवानेते संतोष मुक्ता, नगरसेवक सुनील उटगे, जेष्ठ नेते सुशील कुमार बाजपाई, भाजपा शहराध्यक्ष लहू कांबळे,  प्रा. भीमाशंकर राचट्टे, युवा मोर्चाचे धनराज परसने, अॅड. अरविंद कुलकर्णी, माजी नगरसेवक दिगंबर माळी, भाजप अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्षपदी पप्पू शेख, सय्यद बशीरोद्दीन फईम शेख यांच्याासह पत्रकारांनी अभिनंदन केले आहे...


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post