Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जिल्ह्यातील विविध आस्थपना व दुकानासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून दिवस व वेळ निर्धारित

 


जिल्ह्यातील विविध आस्थपना व दुकानासाठी


जिल्हाधिकारी यांच्याकडून दिवस व वेळ निर्धारित


लातूर,दि.6:- जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव व प्रसार टाळण्यासाठी शहरी भागात सर्व प्रकारची दुकाने (अत्यावश्यक व अत्यावश्यक नसलेली, असा भेदभाव न करता ) जी गर्दीत थाटलेली नसून केवळ एकटेपणाने (Single) आस्तित्वात आहेत, ती सुरु ठेवण्यास मुभा आहे. परंतु उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी करताना लातूर जिल्हयातील परिस्थिती प्रत्यक्षरित्या पाहता, सर्व प्रकारची दुकाने चालु राहील्याने मोठया प्रमाणावर गर्दी होऊन भौतिक  अंतर राखले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हयातील नागरीकांकडून भौतिक  अंतर राखून कोवीड-19 चा प्रार्दुभाव होवू नये या दृष्टीकोनातून गर्दी कमी होण्यासाठी आवश्यक उपयोजना करणेसाठी जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये पुढील नमूद केलेल्या  विविध आस्थापना प्रकारानुसार सुरु ठेवण्यासाठी आठवडयातील दिवस व वेळ निश्चित केली असल्याने आदेश जारी केले आहेत.


सोमवार व मंगळवार रोजी ॲटोमोबाईल्स, कॉम्प्युटर/ इलेक्ट्रॉनिक, टायर्स, बॅटरी, रेडीमेड फर्नीचर, मोबाईल शॉपी हे सकाळी 08.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत चालू राहतील. बुधवार व गुरुवार रोजी रेडीमेड कापड, कापड, भांडी, टेलरींग, फुटवेअर, रस्सी/ पत्रावळी, ज्वेलरी, जनरल स्टोअर्स, वॉच स्टोअर्स, सुटकेस व बॅग हे सकाळी 08.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत चालू राहतील.  शुक्रवार व शनिवार रोजी स्टेशनरी, कटलरी, सायकल स्टोअर्स, स्टील ट्रेडर्स, स्क्रॅप मर्चंट, हार्डवेअर, बिल्डींग मटेरीअल, पेंट, उर्वरीत आस्थापना हे सकाळी 08.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत चालू राहतील.


          दररोज  ( रविवार वगळून ) शेती विषयक- बी, बीयाने, औषधे इ. किराणा हे सकाळी 08.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत चालू राहतील.  दररोज  (रविवार वगळून ) खाजगी आस्थापना (सीए कार्यालय, विधीज्ञ कार्यालय, इत्यादी)  हे सकाळी 08.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत चालू राहतील. रविवार सह आठवडाभर हॉस्पीटल, मेडीकल, आरोग्य विषयक सेवा अनिर्बध, आठवडयातील सर्व दिवस सलुन सेवा घरपोच देता येईल (फक्त घरी जाऊन) सकाळी 07.00 ते सायंकाळी 06.00 वाजे पर्यंत.


उपरोक्त प्रमाणे ठरवून दिलेल्यानुसार आस्थापना भौतिक अंतराचे पालन करुन चालु राहतील आणि आस्थापना चालक/मालक/कर्मचारी/ कामगार या सर्व व्यक्तींनी आरोग्य सेतु ॲप वापरणे बंधनकारक आहे.तसेच या व्यतिरिक्त इतर बाबींसदर्भात यापुर्वी लागु करण्यात आलेले प्रतिबंध जसेच्या तसे लागु राहतील, असे ही आदेशात नमुद करण्यात आले आहे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post