Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

‘हल्दीराम’चे मालक अग्रवाल यांचे निधन; लॉकडाउनमुळे परदेशातच अडकले कुटुंबीय


'हल्दीराम’चे मालक अग्रवाल यांचे निधन; लॉकडाउनमुळे परदेशातच अडकले कुटुंबीय


वाढदिवसाच्या एक दिवस आधी झाले निधन
शेवेचे छोटेसे दुकान ते हल्दीराम भुजियावाला (प्रतीक फूड प्रॉडक्ट्स) असा यशस्वी प्रवास करणारे हल्दीराम भुजियावालाचे मालक महेश अग्रवाल यांचे शुक्रवारी मध्यरात्री सिंगापूरमध्ये निधन झाले. यकृताच्या गंभीर आजारामुळे ते त्रस्त होते. गेले तीन महिने सिंगापूरमधील रूग्णायलात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी अग्रवाल वयाच्या ५७ व्या वर्षात पदार्पण करणार होते, मात्र आदल्या दिवशी त्यांचे निधन झाले. यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे त्यांचे कुटुंबीय हे सिंगापूरमध्येच अडकले असून अग्रवाल यांच्यावर पार्थिवावर सिंगापूरमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. अग्रवाल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post