कोरोना विषाणू बाबत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत फेसबुक लाईव्ह द्वारे नागरिकांच्या समस्यांचे निरसन करणार
लातूर, दि.24:- कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्या उपाययोजनांची माहिती तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कोरोना आजारा विषयी काही शंका व प्रश्न असतील तर त्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे रोज सायंकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून करणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणू बाबतच्या त्यांच्या काही शंका प्रश्न असतील तर त्यांनी आजपासून दिनांक 31 मार्च पर्यंत रोज सायंकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना विचारून त्या प्रश्नांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Tags:
LATUR