Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री आठ वाजता पुन्हा देशाला संबोधित करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी

 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री आठ वाजता पुन्हा देशाला संबोधित करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी


जागतिक महामारी घोषित केलेल्या कोरोना व्हायरसनं भारतातही हैदोस घातला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशाला संबोधित करणार आहेत.


रात्री 8 वाजता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत. 


▪तसेच मोदी एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधितांचा आकडा 500 पार गेला आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'जागतिक महामारी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत देशातील जनतेशी संवाद साधायचा आहे. आज, 24 मार्च रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post