Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कोरोना बाधित व्यक्तींसाठी येत्या ४- ५ दिवसात "कोरोना रुग्णालय" -मा.अमित देशमुख

 


 


कोरोनावायरस अपडेट


कोरोना बाधित व्यक्तींसाठी येत्या ४- ५ दिवसात "कोरोना रुग्णालय"


लातुर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 30.03.2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत एकुण 302 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आजयपर्यंत एकुण 3758 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजतागायत एकुण 59 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी रष्ट्रीय विषाणु संस्था, पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी सर्वच  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहे.  आजपर्यंत एकुण 11 व्यक्तींचा  Quarantined कालावधी संपला आहे व इतर 47 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantined मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे अशी माहिती डॉ. मारुती कराळे कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी दिली.
 लातुरकरांनो घाबरुन जावु नये लातुर जिल्हयातील जनतेसाठी आवश्यक बाब म्हणुन या संस्थेचे अतिविशेषोपचार रुगणालय (Super Specality Hospital) हे फक्त कोरोना (कोविड १९) या संसर्गजन्य संशयित / बाधित व्यक्तींसाठी येत्या ४- ५ दिवसात "कोरोना रुग्णालय" कार्यान्वित करण्याचे निर्देश मा. ना. श्री. अमित विलासराव देशमुख मंत्री, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री लातुर यांनी अधिष्ठाता यांना दिले आहेत. (कोविड १९) या संसर्गजन्य संशयित / बाधित व्यक्तींसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकुण 125 खाटांच्या विलगीकरण कक्षाची सर्व यंत्रसामुगीयुक्त व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येत्या ४ - ५ दिवसामध्ये मा. मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार "कोरोना रुग्णालय" कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती डॉ. गिरीष ठाकुर अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी दिली.
 तसेच दिनांक 30.03.2020 रोजी मा. आ. श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी अतिविशेषोपचार रुग्णालयास भेट देवुन पाहणी करुन "कोरोना रुग्णालयासाठी" आवश्यक ती सर्व यंत्रसामुग्री व साहित्य, व्हेंटीलेटर यांची पाहणी केली व खबरदारीचा उपाय म्हणुन  त्वरीत "कोरोना रुग्णालय" कार्यान्वित करण्यात यावे अशा सुचना केल्या अशी माहिती  डॉ. गिरीष ठाकुर अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी दिली.


       
                           अधिष्ठाता,
             विलासराव देशमुख शासकीय 
             वैद्यकीय  विज्ञान संस्था, लातुर


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post