Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

उदगीर तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थीनींची दिशाभूल करून बलात्कार, आरोपी आजून मोकाट! 

उदगीर तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थीनींची दिशाभूल करून बलात्कार ..
पोलिस आणि आरोपी चे संगनमत! आरोपी आजून मोकाट!


उदगीर/प्रतिनिधी
डि.के.उजळंबकर


उदगीर- तालुक्यातील एका खेडेगावातून शहरांमध्ये पदवीचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीला तुला गावी सोडतो, असे सांगून  तिची दिशाभूल करून तिला चाकूर मार्गे  नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार दिनांक २६जानेवारी रोजी देण्यात आली.बलात्कार करणारा एक मित्र आणि त्याचे दोन साथीदार यांच्याविरोधात सदरील पीडित विद्यार्थिनीने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे हे तक्रार दिल्यावरून तीन आरोपी त्यांच्या विरोधामध्ये या विद्यार्थिनी दिशाभूल करून पळून नेणे, तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे, तिला मारहाण करणे अशा स्वरूपातील गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. असे असले तरीही  गाव गाडा चालवणारे काही पुढारी या प्रकरणांमध्ये तडजोड करून प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांना हाताशी धरून काहीतरी गोड बंगाल करत असल्याची चर्चा सध्या उदगीर तालुक्यात जोरात चालू आहे. आरोपीच्या विरुद्ध कलम ३६३,३६६,३७६(d),324,506 भा द वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी संशयीत आरोपी अमोल राजकुमार गांजुरे,,गणेश धोंडीराम  दाजी,रामेश्वर बालाजी पांडे यांना पोलीस प्रशासनाकडून फरार दाखवण्यात आले असले तरी,हे आरोपी दिवसा ढवळ्या खुलेआम फिरत आहेत. अशी चर्चा गावात चालुआहे.


एकंदरीत निर्भया प्रकरण अत्याचारानंतर या कायद्यात दुरूस्ती करून कठोर बनवण्यात आला आहे.परंतू आरोपी ने त्याच मुलीशी लग्न!केले असल्याचे उदगीर ग्रामिण चे पोलीस निरिक्षक सिरसाट यांनी फोटो क्राईम न्यूजशी बोलताना सांगीतले.


आरोपी मात्र सध्या  मोकाटअसून या कायद्याला कोलदांडा घालण्याचे पाप पोलीसच करत असल्याची देखील चर्चा चालु आहे.


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post