Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

दिल्लीत आप च्या लोकोपयोगी कामाला मतदान,संयोजक -बाळ होळीकर

 


दिल्लीत आप च्या लोकोपयोगी कामाला मतदान
संयोजक बाळ होळीकर





लातूर- देशाची राजधानी दिल्लीच्या सुजाण नागरिकांनी  विधानसभेच्या निवडणुकीत  मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या लोकोपयोगी कामाची प्रत्यक्ष अनुभूती घेवून आप ला सलग दुसर्‍यंादा विक्रमी मतांनी  विजयी करु, देशाच्या नागरिकांना यापुढे आपल्या मुलभूत प्रश्‍नांवर व देशाच्या विकासाच्या मुद्यांवर मतदान करावे असा जणू संदेशच दिला असल्याचे आम आदमी पार्टीचे लातूर विधानसभा संयोजक बाळ होळीकर यंानी म्हटले आहे.
मागील पाच वर्षांपूर्वी आम आदमी पार्टीकडे दिल्लीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी लोकोपयोगी कामांवर भर देण्याची प्रयत्न केला पण केंद्राच्या अधिपत्याखालील नायब राज्यपालांनी साडेतीन वर्षे दिल्ली सरकारच्या कामाला अटकाव करण्याचे काम केले .पण न्यायालयाने लोकाने निवडलेले मत्रिमंडळच श्रेष्ठ असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर केंद्र शासनाची भूमिका मवाळ झाली.मग अरविंद केजरीवाल यांनी झपाट्याने अधिक वेगाने सरकारी शाळांच्या अद्यावत इमारती उभारणे,शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे, मुहल्ला क्लिनीकच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा सुरु केल्या.२०० युनीटपर्यंतची वीज मोफत केली.२० हजार लिटर मोफत स्वच्छ पाणी सुरु केले.सीसीटीव्ही कॅमेर्‍याची रेलचेल करुन महिलांसह दिल्लीची सुरक्षा मजबूत केली.ज्येष्ठांना मोफत देवदर्शनाची आणि महिलांना सीटीबसचा मोफत प्रवास सोय केली.काळाची गरज म्हणून वायफायची सोय केली.घरपोच राशनची सोय केली. जात,उत्पन्न आदी प्रमाणपत्रेही घरापर्यंत देण्याचे काम केले.फ्लायओव्हर चक्क अर्ध्या किंमतीत व दर्जेदार बनवून घेतले. २५ टक्के प्रदुषण कमी करण्यात यश मिळवले, जनतेला विचारुन दरवर्षीचे बजेट तयार केले.व्यापार्‍यांना विश्‍वासात घेवून कर न वाढविता पैसा मिळवून राज्याची आर्थिक स्थिती मजबूतच नव्हे तर नफ्यात आणली,त्यावर सीएजीने शिक्कामोर्तब करुन कौतुक केले.विशेष म्हणजे भ्रष्टाचाराचा मागमूस दिल्ली सरकारच्या कारभारात कुठेच राहिलेला नाही,हा अनुभव दिल्लीचा सुजाण मतदारांनी प्रत्यक्ष घेवून भ्रष्टाचारी,दमनकारी,देशाला गुमराह करणार्‍या भाजपा,आणि मरगळलेल्या कॉंगे्रसला चार हात दूर ठेवण्यासाठी या विधानसभा निवडणूकीत ७० पैकी ६३ जागावर विजयी करुन ईमानदार केजरीवालांच्या लोककल्याणकारी राज्यपध्दतीवर शिक्कामोर्तब केले आहे,त्यामुळे दिल्लीकर मतदार आणि आम आदमी पार्टीच्या विजेत्यांचे जाहीर अभिनंदन करुन देशातील जनतेेने लोक आणि संविधानाप्रती ईनामदारी बाळगणार्‍या आम आदमी पार्टीच्या उभे रहावे, असे आवाहनही संयोजक बाळ होळीकर यांनी केले आहे,दरम्यान,दिल्लीतील आपल्या विजयाच्या पार्श्‍वभूमीवर लातूरच्या आप पदाधिकार्‍यांनी महापुरुषांना अभिवादन करुन पेढे वाढून आनंदोत्सव साजरा केला.



 


Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post