Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

क्रीडा सप्ताहाला उस्फूर्त प्रतिसाद तायक्वांदो व कुस्ती खेळात खेळाडूंनी मिळवली सर्वाधिक पदके

क्रीडा सप्ताहाला उस्फूर्त प्रतिसाद तायक्वांदो व कुस्ती खेळात खेळाडूंनी मिळवली सर्वाधिक पदके.

जिल्हा क्रीडा अधिकारी लकडे यांच्या हस्ते झाले पदकांचे वितरण




लातूर दि 19 डिसेंबर राज्यातील क्रीडासंस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने दरवर्षी राज्य क्रीडा परिषद, क्रीडा व युवक सेवा संचनालय यांच्या वतीने क्रीडा सप्ताहाचे आयोजन केले जाते याही वर्षी दिनांक 12 ते 18 डिसेंबर दरम्यान या सप्ताहाचे राज्यात आयोजन करण्यात आले तर लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते या खेळापैकी तायक्वांदो व कुस्ती या खेळाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येवर खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता दरम्यान विविध खेळातील विजेत्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले आहे.

दिनांक 12 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या क्रीडा सप्ताहाला संमिश्र प्रतिसाद मिळाला तर या सप्ताहाच्या आयोजनाची जबाबदारी क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांच्यावर सोपविण्यात आली होती कार्यक्रमाचा समारोप बहुउद्देशीय इंडोर हॉल जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड लातूर येथे पार पडला या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, क्रीडाधिकारी बावणे, आशियाई ताईक्वांदो महासंघाचे अधिकृत प्रशिक्षक तथा एन आय एस तायक्वांदो प्रशिक्षक नेताजी जाधव, ॲथलेटिक्स प्रशिक्षक समाधान बुर्गे, इंटरनॅशनल कराटे प्रशिक्षक अजमेर शेख, एन आय एस कुस्ती प्रशिक्षक यांची उपस्थिती होती.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post